आंतरवालीत आज ठरणार लढायचं की पाडायचं, जे संपवायला निघाले त्यांना पाडण्यात मोठा विजय

आज रविवार, 20 रोजी मराठा समाजाची निर्णायक बैठक पार पडणार असून, शेवटची बैठक आहे. या बैठकीत निवडणूक लढायचं ठरलं तर फॉर्म भरायचे आहेत, नाही ठरलं तर उमेदवार पाडायचे ठरवणार असून, जे आम्हाला संपवायला निघाले त्यांना संपविण्यात मोठा विजय असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

13 महिन्यांपासून मराठे एक एकत्र आल्याने एक चुकीचा फटाका बसला नाही पाहिजे, आम्ही राजकारण नाही. सामाजिक म्हणून एकत्र आलो. आम्हाला नाईलाजाने राजकीय रस्त्यावर आणले. समाज संपविण्यासाठी निघालेल्यांना हरविणेसुद्धा लढण्यापेक्षा मोठा विजय असल्याचेही सांगितले. आम्हाला तयारी करण्यासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत. जो निर्णय होईल तो घराघरात मराठा समाज वाट पाहत आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

– आज वकील, राजकीय अभ्यासक यांची आज बैठक घेऊन सल्ला घेण्यात आला आहे. समाजाला, मला वेळ आहे, पण प्रक्रियेला वेळ नाही. मी तयार आहे, समाज सुद्धा तयार आहे, फक्त समाजाला सांगायचं आहे. लढायचं ठरलं तर प्रचाराला टेन्शन नाही. म्हणून तीन महिन्यापासून सांगतोय तुम्ही सावध रहा. सगळय़ांनी आपले कागदपत्र काढून ठेवा. उद्या लढणं होईल नाहीतर पाडणं होईल, असंही त्यांनी सांगितलं