महाराष्ट्रासह झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची युती झाली असून त्यांच्यात जागावाटपही झाले आहे. झारखंडमध्ये 81 जागांपैकी 70 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस निवडणूक लढवेल. तर उर्वरित जागांवर राजद, सीपीएम आणि इतर पक्ष निवडणूक लढवतील.
असे असले तरी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस नेमक्या किती जागा लढवतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हेमंत सोरे यांनी काँग्रेच्या झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या उपस्थितीत जागावाटपाची घोषणा केली होती. यावेळी राजद आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित नव्हते.
जागावाटपाबद्दल मित्रपक्षांची चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी दिली आहे. तसेच राजद आणि डाव्या पक्षांशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा नेमक्या किती जागांवर आणि कुठल्या जागांवर लढेल हे स्पष्ट होईल असेही सोरेन म्हणाले.