मणिपुरात भाजपच्या 19 आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला, पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले

कोविडच्या संकटानंतर मणिपुरात 3 मे 2023 पासून कुकी आणि मैतई समुदायात जातीय हिंसाचार पेटला आहे. गेल्या दीड वर्षात केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठलाही पर्याय निघाला नाही. त्यामुळे 18 महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीकर मणिपूरमधील भाजपच्या 19 आमदारांनी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना हटकण्याची मागणी केली. राजधानी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हिंसाचार थांबकण्याचा हा एकमेक मार्ग असल्याचे म्हटले आहे.

दीड वर्षापासून सुरक्षा यंत्रणा सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर सुरक्षा दलांच्या तैनातीने काहीही होणार नसल्याचा दावा स्थानिक आमदारांनी केला आहे. केंद्रीय आणि राज्यातील गृह खात्याचे अनेकदा आंदोलकांनी वाभाडे काढले होते. पोलीस चौक्यांसह शस्त्र्ाs ताब्यात घेतल्यानंतर जवानांची हत्या केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हिंसाचार दीर्घकाळ सुरू राहिल्यास एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची प्रतिमाही डागाळली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.