कल्याण रेल्वे स्थानकात रात्री 8:55 वाजता टिटवाळ्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकलचा शेवटचा डबा घसरल्याची घटना नऊ वाजता घडली. त्यामुळे फलाट दोन वर जाणाऱ्या लोकलचा गोंधळ झाला. ही घटना घडल्याने रात्री डाऊन मार्गावर जाणाऱ्या तसेच अप मार्गावरून येणाऱ्या लोकलचा गोंधळ उडाला.
जी लोकल मुंबईकडे जाणार होती, त्यातील प्रवासी उतरून लगेच फलाट चारवर गेले आणि त्यांनी दुसरी लोकल पकडून ते पुढे गेले. खडवली, आसनगाव, टिटवाळा दिशेकडून येणाऱ्या लोकलचा त्यामुळे खोळंबा झाला होता. फलाटात ही घटना घडल्याने अन्य मार्गावरील सर्व रेल्वेसेवा सुरू होती. गाडीचा डबा रुळावर आणण्यासाठी ट्रॅक देखभाल करणारे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. असून डब्बा ट्रॅक वर घेण्याचे प्रयत्न सुरु आहे