स्वच्छ , स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी बुरोंडी बंदर प्रसिद्ध बंदर आहे. अशा बंदरात वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारी खायच्या वारी मत्स्यहारींना बाजारात मासे विक्रीसाठी आले नसल्याने रित्या हाती माघारी फिरावे लागले. त्यामुळे त्यांचा मासे खाण्याचा बेत फसला आणि मासळीची भुख चिकनवर भागवावी लागली.
दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदर हे स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी बंदर म्हणून या बुरोंडी बंदराची दापोलीत सर्वदूर ख्याती आहे. या बुरोंडी बंदरात मासेमारी करणा-या 135 च्या दरम्यान लहान होडया आहेत. या होडयांचे मालक आपल्या खलाशी नाखवांसह दररोज मध्यरात्री 2 ते पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बंदरात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पागलेली मासळी किनाऱ्यावर घेऊन येतात. त्यामुळे या बंदरात दररोज ताजी मासळी खवय्यांना विकत घेता येते. बुरोंडी बंदर असूनही येथे मासळि विक्रिसाठी मासळि मार्केट नाही त्यामुळे होडीतून उतरल्या उतरल्या मासळी विकत घ्यावी लागते.
बुरोंडीत सकाळच्याच वेळी ताजी मासळी विकत मिळत असल्याने दापोली शहरासह तालुक्यातील बुरोंडी बंदराला जवळ असलेल्या गावातील हाॅटेल व्यवसायिकांसह घरी खाण्यासाठी मत्स्यहारी खवय्ये हे मासळी येथे येवून विकत घेत असतात. अशा या ठिकाणी स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून गेली तरी बंदराला अजूनही जेटीची व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे होड्या लावताना मासेमारांची चांगलीच दमछाक होते. स्वच्छ, स्वस्त आणि ताज्या मासळीसाठी बुरोंडी बंदराची ख्याती असल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने मत्स्यहारी खवय्ये मासळी खरेदीसाठी बुरोंडी बंदरात सकाळीच दाखल झाले होते. मात्र वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याकारणाने मासेमारी करिता होड्या बंदरात गेल्याच नव्हत्या त्यामुळे मासळी विकत घेण्यासाठी आलेल्यांना रिकाम्या हाती परत माघारी फिरावे लागले.