दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तराखंडच्या एका पंधरा वर्षीयमुलीवर पाच जणांनी सामुहीक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पाचपैकी 3 मुलं ही रायगडमधील असून पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पिडीता दहावीला असून ती उत्तराखंड येथील हल्द्वानी येथील रहिवाली आहे, तिने उत्तराखंड येथून 4 ऑक्टोबर रोजी दिल्लीसाठी ट्रेन पकडली होती. तिच्यावर दिल्ली विमानतळ परिसरात 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी बलात्कार करण्यात आला. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार हल्द्वानी पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि मुलीचा फोन ट्रॅक केला. पोलिसांनी तिच्या फोनचे लोकेशन दिल्लीच्या हॉटेलमध्ये दिसले जिथे तिच्यावर बलात्कार झाला. याप्रकरणी पोलिसांनी पीडीतेचा जबाब नोंदवला असून तिला हल्द्वानी येथे आणण्यात आले आहे. पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून हे पाचही तरुण मित्र आहेत. ते दिल्ली आणि महाराष्ट्रातील आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हलद्वानी पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निश्चित झाले. हे प्रकरण कलम 70 अंतर्गत नोंदवण्यात आले आहे आणि पोस्को कायद्यांतर्गत पाचही जणांवर गुन्हगा दाखल केला असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. संदेश चिपळकर(25), रोशन पाटील (29), योगेश नाईक (34) हे रायगडमधील असून दिल्लीच्या आशिष आगरकर (30) आणि साहिल कुमार (24) अशी आरोपींची नावे आहेत.