आम्ही उद्याच युद्ध संपवायला तयार मात्र…, बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला घातली अट

israel-benjamin-netanyahu

इस्त्रायली सैनिकांकडून हमास नेता याह्या सिनवार याचा खात्मा झाल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या संभाषणात सांगितले की, हमाससोबत सुरू असलेले युद्ध उद्याच संपवतील. मात्र त्यासाठी हमासला त्यांच्या कैदेत ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडावे लागले. त्यामुळे आता हमास इस्त्रायलच्या या अटी मान्य करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमासच्या कैदेत अजूनही इस्त्रायलचे 102 लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना सोडविण्यासाठी इस्त्रायल सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एका व्हिडीओ माध्यमातून  गाझाच्या लोकांसाठी खास मेसेज दिला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ज्या सिनारला तुम्ही वाघ समजत होतात, तो स्वत: गुहेत लपला होता. तो तुमचे भले करू शकत नव्हता. अमेरीकाही सिनारच्या हत्येमुळे आनंदी आहे. हेच कारण आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी इस्त्रायली पंतप्रधानांशी फोनवर बोलून अभिनंदन केले. शिवाय युद्धाबाबत पुढील गोष्टींवर विचार मांडण्यात आले. चर्चेदरम्यान जो बायडेन यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगत आमचे पुढील लक्ष्य आमच्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका असेल, असेही ते म्हणाले.