पैसे वसूल करण्यासाठी ठगाने महिलेचे मॉर्फ पह्टो व्हायरल करत तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
अंधेरी येथे एक महिला राहते. ती एका खासगी पंपनीत वरिष्ठ पदावर काम करते. त्या पंपनीत फिल्ड वर्क करणाऱ्याला महिला ओळखते. गेल्या आठवडय़ात महिला या कामावर असताना त्यांना एका नंबरवरून पह्न आला. त्याने महिलेला एक पह्टो पाठवला. तो पह्टो महिला आणि तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या एकाचा होता. त्या पह्टोसोबत एक ऑडिओदेखील होता. त्या व्यक्तीने काही रक्कम घेतली आहे. ती रक्कम परत न केल्यास पह्टो सोशल मीडियावर व्हायरल करू असे त्याने महिलेला सांगितले.
त्यानंतर काही वेळाने महिलेला अन्य नंबरवरून पह्न आले. ते पह्न महिलेने उचलले नाही. काही वेळाने महिलेला एका नंबरवरून मेसेज आले. त्या मेसेजमध्ये महिलेचा मॉर्फ केलेला पह्टो होता. त्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली. त्या घटनेने महिला चांगलीच घाबरली. महिलेने याची माहिती तिच्या कार्यालयात काम करणाऱ्या एकाला दिली. त्यानंतर महिलेने पवई पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.