जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुह्याचा तपास सीबीआयकडून केला जाणार आहे.
पुणे पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना नवटाके यांनी बीएचआरचे लिक्वीडेटर व इतरांनी मिळून पतसंस्थेच्या सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गैरव्यवहार प्रकरणात डेक्कन पोलीस ठाणे, आळंदी व पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. पुण्यातून जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली होती. गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.