सीमावादावरून हिंदुस्थान-चीनदरम्यान तणाव वाढलेला असला तरी व्यापाराच्या बाबत चित्र वेगळे आहे. चीन हा हिंदुस्थानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार ठरला आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान चीनमधून आयात व्यापाराची उलाढाल 56.29 अब्ज डॉलर एवढी झाली, तर निर्यात
भागीदार मध्ये अमेरिका टॉपवर आहे. हिंदुस्थानची अमेरिकेची निर्यात 5.62 टक्क्यांनी वाढून 40.38 अब्ज डॉलर झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हिंदुस्थानची चीनमधून आयात 11.5 टक्के वाढली. चीन, रशिया, यूएई, अमेरिका, इराक, सौदी अरब, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर या देशांमध्ये हिंदुस्थानातून जास्त आयात होते. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान रशियामधून आयात वाढून ती 32.18 अब्ज डॉलर झाली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 30.43 अब्ज डॉलर एवढी होती. यूएईमधील आयातही वाढली आहे.
चीनमध्ये निर्यात
अमेरिका, यूएई, नेदरलँड, ब्रिटन, चीन, सिंगापूर, सौदी अरेबिया, बांगलादेश, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिका हे हिंदुस्थानच्या निर्यातीचे टॉप 10 देश आहेत. चीनमध्ये आपण 6.91 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. या वर्षी यूएईमध्ये एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान हिंदुस्थानची निर्यात वाढून 17.24 अब्ज डॉलर झाली आहे.
2023-24 मध्ये हिंदुस्थानचा नंबर पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल चीन दुसऱया क्रमांकावर आहे. चीन 2013-14 पासून 2017-18 आणि 2020-21 मध्ये हिंदुस्थानचा आघाडीचा व्यापारी भागीदार होता. चीनच्या आधी संयुक्त अरब अमिरातीशी हिंदुस्थानचा व्यापार मोठय़ा प्रमाणात होता. 2021-22 आणि 2022-23 मध्ये अमेरिका हा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला.