अमेरिकेत मंदीच्या त्सुनामीने दार ठोठावले, कर्जाचा बोझा प्रचंड वाढला

जागतिक महासत्ता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अमेरिकेत मंदीने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. अमेरिकेत संभाव्य आर्थिक मंदीची भीती बळकट होत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, अमेरिकेतील छोट्या कंपन्यांची अवस्था बिकट झाली असून रसेल 2000 इंडेक्समधील कंपन्यांपैकी 43 टक्के कंपन्या नुकसानीत सापडल्या आहेत. कंपन्यांना व्याज भरण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे जे 2003 नंतर सर्वोच्च पातळीवर पोहोचले असून फेड रिझर्व्हच्या वाढीव व्याजदरामुळे या कंपन्यांना व्याज भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. या वर्षी आता पर्यटन 512 मोठय़ा कंपन्यांनी दिवाळखोर घोषित केले, जे 2020 साली कोरोना काळात फक्त सहा कमी आहे. कोरोना कालावधी काढून टाकला तर 14 वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये 59 कंपन्यांनी दिवाळखोरी झाल्या तर ऑगस्टमध्ये 63 कंपन्यांनी दिवाळखोर घोषित केले.

दररोज 1.8 अब्ज डॉलर्स व्याजासाठी खर्च 

अमेरिकेत छोट्याच काय तर मोठ्या कंपन्यांही अडचणीत सापडल्या आहेत. अमेरिकेवर वाढत्या कर्जाचा भारही वाढत असून सध्या 35.7 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे जो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या 125 टक्के आहे. 2000 मध्ये अमेरिकेवर 5.7 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते जे 2010 मध्ये 12.3 ट्रिलियन आणि 2020 मध्ये 23.2 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. पुढील दशकापर्यंत देशाचे कर्ज 54 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अमेरिकेला दररोज 1.8 अब्ज डॉलर्स व्याजासाठी खर्च करावे लागत आहे.