दिल्लीत केस दाखल असल्याची बतावणी, 23 लाखांना गंडा

बँक खात्याचा वापर मनी लॉण्डरिंगसाठी होत असल्याची बतावणी करीत सायबर चोरटय़ांनी तरुणाला दिल्लीमध्ये केस दाखल असल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याचे सांगत त्यांच्याकडून माहिती घेतली. तक्रारदाराला भीती घालून तब्बल 23 लाख 55 हजार रूपये विविध बँक खात्यात वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सायबर चोरटय़ांनी त्यांना 21 सप्टेंबरला फोन केला. तुमच्या नावे दिल्लीत केस दाखल असून, बँक खात्यातून मनी लॉण्डरिंग झाल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करावयाचे असल्याचे सांगून, विविध बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले.