विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन एक दिवस उलटत नाही तोच महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत राज्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीच्या मित्रपक्षांत कमालीची नाराजी आहे. महादेव जानकर यांनी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती, पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जानकर म्हणाले, माझ्याशी महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी पुणीही संपर्प साधलेला नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीने विधानसभेच्या 288 जागांवर लढण्याची तयारी करत आहे.
लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती, पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील 200 मतदारसंघांमध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मते घेऊ. काही ठिकाणी दहा हजारांपेक्षा जास्त मते घेऊ, असे जानकर म्हणाले.