सलमान खानला झेड प्लस सुरक्षा

अभिनेता सलमान खान याला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. सलमान खान सतत लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. बाबा सिद्दिकी यांची सलमान खानसोबत मैत्री होती. सलमानच्या सुरक्षेसाठी 30 सुरक्षा कर्मचारी असतील. यात एनएसजी कमांडो आणि पोलीस असतील. जे दोन पाळ्यांमध्ये काम करतील. या सुरक्षा दलाकडे पाच गाडय़ा असतील ज्यात बुलेटप्रूफ गाडय़ांचाही समावेश असणार आहे. या सुरक्षेसाठी वर्षाला पाच कोटी रुपये खर्च येईल असे सांगण्यात येत आहे. झेड प्लस सुरक्षेसाठी मुंबई पोलीस, जवान, सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक यांचाही समावेश असणार आहे.