हमासच्या आणखी एका कमांडरचा खात्मा, इस्रायलच्या सैनिकांवरील ड्रोन हल्ल्याचा होता मास्टरमाईंड

इस्त्रायल-हमासच्या युद्धामुळे मध्यपूर्व भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे. इस्रायलच्या सैन्याने (IDF) आता मोठा दावा केला आहे. हमासचा उत्तरी गाझा यूएवी कमांडर महमूद अल मबौहचा खात्मा केला आहे. त्याने इस्त्रायलच्या सुरक्षा दलांना आणि नागरिकांवर ड्रोन हल्ला करण्याचा इशारा दिला होता. जबालिया आणि राफामध्ये ड्रोन हल्ले केले. ज्यामध्ये 50 हून अधिक हमासचे दहशतवादी मारले गेले, असे आयडीएफने सांगितले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाझाच्या आठ निर्वासित छावण्यांपैकी सगळ्यात मोठ्या जबालियाच्या अल-फलूजाजवळ इस्त्रायली गोळीबारात जवळपास 17 जण ठार झाले. याशिवाय दक्षिण गाझामध्ये पूर्वी खान युनिसचा बानी सुहैला छावण्यांमध्ये आणखी 10 जण ठार झाले. याआधी मंगळवारी इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या सबरामध्ये तीन घरं उद्ध्वस्त झाली. वृत्तानुसार, स्थानिक नागरिक आपत्कालिन सेवाने सांगितले की, त्यांनी घटनास्थळावरून 2 मृतदेह सापडले. तर आणखी बाराजणांचा शोध सुरू आहे. त्यावेळी ते तिथल्या घरांमध्ये होते. इस्त्रायलचे सैनिक गेल्या 10 दिवसांपासून जबालियावर निशाणा साधून उत्तरी क्षेत्रात परतत आहेत.

मध्यपूर्वेत इस्त्रायल सध्या अनेक भागात लढाई लढत आहे. इस्त्रायलने पूर्व लेबनॉनमध्ये एअरस्ट्राइक वाढवले आहे. मंगळवारी बेका घाटामध्ये अनेक हवाई हल्ले झाले. ज्यामध्ये बालबेक शहराजवळील निवासी क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले. इस्त्रायलच्या सैनिकांनी एका वक्तव्यात सांगितले की, अप्पर गॅलीलीमध्ये सायरन वाजवल्यानंतर लेबनॉनमधून इस्त्रायलमध्ये प्रवेश केलेल्या दोन ड्रोनची ओळख पटली आहे. त्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.