अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी एका तरुणावर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पीडित मुलगी ही मालवणी परिसरात राहते. आरोपी हा मुलीच्या आईचा मित्र आहे. गेल्या आठवड्यात पीडित मुलगी ही तिच्या घरी झोपली होती. तेव्हा त्याने मुलीसोबत अश्लील चाळे केले. अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो पळून गेला होता. मुलीने याची माहिती तिच्या वडिलांना दिली. वडिलांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली. या गुह्यातील आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर मालवणी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारवाईच्या भीतीने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.