‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 2 डिसेंबरला या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे. यात वनिता खरात, इशा, नम्रता संभेराव, प्रसाद ओक आणि समीर चौघुले यांचे पात्र पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, हास्याची गुगली टाकून विनोदांनी क्लीनबोल्ड करायला पुन्हा घेऊन येत आहोत… महाराष्ट्राची हास्य जत्रा. पाहूया, महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीची हॅट्ट्रिक. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा शो अमेरिकेत होत होता. त्यामुळे या शोने 19 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर असा मोठा ब्रेक घेतला होता.