उद्धव ठाकरे पुन्हा जनतेच्या सेवेसाठी तयार, आदित्य ठाकरे यांची पोस्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नियमित तपासणीसाठी सर एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे.

”आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासण्या केल्या. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे. ते आता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी तयार आहेत”, अशी पोस्ट आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.