टाटा समूहाची धुरा रतन टाटांचे धाकटे बंधू नोएल टाटांच्या हाती, टाटा ट्रस्टच्या बैठकीत एकमताने निर्णय

नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे संचालक झाले आहेत. रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 1991 साली रतन टाटा यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हापासून 32 वर्ष रतन टाटा या पदावर होते. आता त्यांच्या पश्चात नोएल टाटांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून गेली 40 वर्ष ते टाटा ग्रुपशी जोडले गेले आहेत.

टाटा ट्रस्टमध्ये नोएल टाटा सुरुवातीपासूनच सक्रिय राहिलेले आहेत. सध्या ते सर रतन टाटा आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. दोन्ही ट्रस्ट हे टाटा ट्रस्टचाच भाग आहेत. हा ट्रस्ट टाटा समूहाच्या समजासेवेसंबंधित कामकाज पाहतो. तसेच ही संस्था टाटा ग्रुपची मुख्य कंपनी आहे त्यात टाटा ट्रस्टचे 66 टक्के होल्डिंग्ज आहेत.

नोएल टाटा हे टाटा समुहाची रिटेल कंपनी ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्वेस्टमेंट चे संचालक असून टाटा स्टील आणि टायटन चे उपसंचालक आहेत. त्यांच्या कार्यकाळात टाटा ट्रेंटची मार्केट कॅप 2.93 लाख कोटी रुपये पर्यंत पोहोचली होती. नोएल टाटा हे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड चे 11 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल 500 मिलियन डॉलरवरून 3 बिलियन डॉलरवर पोहोचली होती.