दिल्लीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचे 200 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. दिल्लीत आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक टोळी हे ड्रग रॅकेट चालवत होतं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत ड्रग्ज आणणारा आरोपी लंडनमध्ये पळून गेला आहे. ज्या गाडीमधून हे ड्रग्ज आणलं गेलं त्या गाडीला जीपीएस लावलं होतं. रमेश नगरच्या गोडाऊनमध्ये ही गाडी पोहोचली तेव्हा पोलिसांनी कारवाई केली. ज्या सिंडिकेटकडून साडे पाच हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले होते त्यांचं हे ड्रग्ज असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. हा ड्रग्ज सिंडिकेटचं जाळं दुबईपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.