देशातल्या अनेक बार असोसिएशनचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना एक पत्र लिहीले आहे. त्या पत्राच्या माध्यमातून सुनावणी दरम्यान वकिलांशी योग्य पद्धतीने बोलावे, न्यायमूर्तींनीही शिष्टाचाराची काळजी घ्यावी आणि कोणत्याही वकिलाचा अपमान होता कामा नये अशा मागण्या केल्या आहेत. याबाबत मद्रास उच्च न्यायलय, तामिळनाडू बार असोसिएशन आणि पडुचेरी बार असोसिएशनने सीजेआय चंद्रचूड यांना एक पत्र लिहीले आहे.
पत्रात लिहीले आहे की, वकिलांसोबत बोलताना सन्मानपूर्ण भाषेचा वापर केला पाहिजे. जे न्यायमूर्ती स्वत:ला वकिलापेक्षा मोठे समजतात, त्यांच्यावर ओरडतात त्यांच्यावर लगाम आणला पाहिजे. एका निवेदनात म्हणाले आहेत की, वकिल आणि न्यायमूर्ती यांना न्याय प्रशासनात एकसमान अधिकार आहे. मात्र तरी काही न्यायमूर्तींना असा समज झाला आहे की, वकील त्यांच्या हाताखाली येतात. त्यामुळे ते सुनावणी दरम्यान वकिलांवर ओरडतात, त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलतात. अनेक प्रसंगी त्यांना कमी लेखलेही जाते. अनेक प्रसंगात त्यांच्या शिष्टाचार ध्यानात घेतले जात नाही.
आता मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद 1 ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे सुरु झाला. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती एल व्हिक्टोरिया गौरी यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्याप्रकरणी एक वेळ अशी आली न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांच्याकडून वरिष्ठ वकिल पी. विल्सन यांना फटकारले. एवढेच नाही त्यांना वकिलांनी युक्ती करुन त्यांना अनेक प्रकरणातून दूर करण्याचा प्रयत्न केला. वकिल सातत्याने माफी मागत होते मात्र न्यायमूर्तींनी त्यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. त्यांचा विषय समजण्यासही त्यांनी नकार दिला. आज सीजेआय चंद्रचूड या विवादावर काय निर्णय घेतात, त्यांचे काय म्हणणे आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच काही प्रकरणात चंद्रचूड यांना संतापताना पाहिले आहे, अनेकदा सुनावणी दरम्यान त्यांनी वकिलांना फटकारले आहे.