Rafael Nadal retire – ‘लाल मातीचा बादशहा’ राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, कधी खेळणार अखेरचा सामना?

प्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. राफेल नदालने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. या दिग्गज खेळाडूने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

राफेल नदाल या व्हिडीओत म्हणाला आहे की, फार विचार करुन हा निर्णय घेतला आहे. त्याच्या करिअरमधील अखेरचा सामना डेव्हिस कप असेल. ही तिच टुर्नामेण्ट आहे जिथे त्यांनी 2004 साली यशस्वीपणे कारकिर्दीला सुरुवात केली होती. राफेल नदाल याने व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये मागची दोन वर्ष त्याच्यासाठी फार कठिण होती. त्यात तो 100 टक्के देऊ शकला नाही आणि त्यामुळेच त्याने हा कठिण निर्णय घेतला आहे. नदाल याने पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये 12 भाषेंमध्ये सर्वांना धन्यवाद केले आहे.

त्याच्या या प्रवासात त्याला ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे त्याने आभार मानले आहेत. ज्यांनी त्याच्या कारकिर्दीचा बराच काळ ज्यांच्यासोबत घालवला त्या विरोधकांचेही त्याने आभार मानले आहेत. नदालने रोजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपल्या आईचेही आभार व्यक्त केले आहेत. नदाल म्हणाला की, त्याच्या आईने केलेल्या त्यागामुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला. सोबत त्याने 19 वर्ष साथ देणाऱ्या आपल्या पत्नीचेही आभार मानले आहेत. नदालच्या म्हणण्यानुसार, त्याच्या काकांनीही त्याच्या करिअरमध्ये महत्वाची भूमिका निभावली, ज्याच्यामुळे त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली.

राफेल नदालने आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 12 फ्रेंच ओपन, दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन विम्बल्डन आणि चार यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरी प्रकारात सुवर्णपदक आणि 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. इतकेच नाही तर 2004, 2009, 2011 आणि 2019 मध्ये डेव्हिस कप जिंकणाऱ्या स्पॅनिश संघाचाही नदाल भाग होता.