हिंदुस्थानच्या उद्योग क्षेत्रातील रत्न रतन टाटा यांनी 86 वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी टाटा समूहाला वेगळी ओळख देत नव्या शिखरावर नेले. रतन टाटा यांच्या सुमो आणि इंडिका या कारना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी औद्यागिक क्षेत्रात अनेक नव-नवे यशस्वी प्रयोग केले आहेत, त्यापैकीच एक म्हणजे टाटा नॅनो. जाणून घेऊया टाटा नॅनोच्या जन्माची रंजक कथा…
अग्रेषित विचार करणारे उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांचे 2003 मध्ये एक धाडसी स्वप्न खरे करून दाखवले. हिंदुस्थानातील मध्यमवर्गीयांसाठी सुरक्षित आणि परवडणारी गाडी तयार करणे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या अनोख्या दृष्टीकोनातून टाटा नॅनोची निर्मिती झाली.
2000 दशकाच्या सुरूवातीला, एक जोडपे आपल्या मुलांना मांडीवर बसवून भर पावसात स्कूटरवरून प्रवास करताना पाहिले. हे पाहिल्यानंतर त्यांना मध्यमवर्गीय हिंदुस्थानींसाठी सुरक्षित, आकाराने लहान आणि परडवणारी अशी कार बनविण्याचा निर्धार रतन टाटा यांनी केला. त्यानंतर टाटा मोटर्सने किफायतशीर आणि सुरक्षित वाहन तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले, आणि चार जण आरामात बसू शकतील असे एक डिझाइन बनवले. या गाडीचे नाव नॅनो असे ठेवण्यात आले. गुजरातीमध्ये नॅनो म्हणजे लहान असा या शब्दाचा अर्थ होतो.
जानेवारी 2008 मध्ये नवी दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये टाटा नॅनो लाँच करण्यात आली. कमी किंमत आणि कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे या गाडीने जगभरात प्रसिद्धी मिळविली. या कारला पीपल्स कार म्हणून ओळख मिळाली. रतन टाटांच्या या स्वप्नाशी देशातील एक मोठा वर्ग स्वत:ला जोडून पाहू लागला होता. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर इतर विकसनशील देशांमध्येही या गाडीची विक्री उपलब्ध करून देण्यात आली.
2009 मध्ये लाँच झालेल्या नॅनोने तिच्या किंमतीसह नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे जागतिक लक्ष वेधून घेतले. टाटा मोटर्सने 2018 पर्यंत नॅनोच्या 275,000 पेक्षा जास्त गाड्यांची विक्री करून नॅनोच्या यशाचा उल्लेखनीय प्रवास दर्शवला.
लाँचनंतर हिंदुस्थानात खेरदीदारांची बुकिंगसाठा लाट उसळली होती. हजारो लोक गाडी खरेदी करण्यासाठी उत्सुक होते. अवघी लाखभर किंमत असलेली ही कार खरेदी करण्यासाठी शोरूमबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. नॅनोने सर्व सामान्यांना परवडेल असे वाहतुकीच्या दृष्टीने मोठे पाऊल म्हणून पाहिले जात होते.