मानवाचा मंगळावर 500 दिवस मुक्काम राहणार, नासाची नवी मोहीम

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने नवी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत नासा मानवाला मंगळावर पाठवणार असून त्या ठिकाणी 500 दिवस मुक्काम करणार आहे. या मोहिमेसाठी नासाने तारीखही जाहीर केली असून येत्या 2035 पर्यंत म्हणजेच पुढील 10 ते 11 वर्षांत ही मोहीम पूर्णत्वास नेणार आहे. हा प्रवास सोपा करण्यासाठी नासाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. पृथ्वी ते मंगळ या एकाच मार्गाच्या प्रवासाला 6 ते 7 महिने लागणार असून या अंतर्गत 400 दशलक्ष किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. मंगळावर जीवसृष्टीच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी आणि इतर अनेक प्रयोग करण्यासाठी त्या ठिकाणी अंतराळवीर पाठविण्याची नासाची योजना आहे. सध्या मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण नाही. त्या ठिकाणी माणूस जिवंत राहू शकेल.  

अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार

नासाने नोव्हेंबर 2022 मध्ये आर्टेमिस 1 मोहिमेद्वारे महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. अंतराळ प्रक्षेपण प्रणाली (एसएलएस) आणि ओरियन अंतराळयानाचा वापर करून ही मोहीम यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आली आणि पृथ्वीवर सुखरूप परतण्यापूर्वी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत होती. आर्टेमिस 3 ही पहिली क्रू मिशन 2026 मध्ये होणार असून अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे.