देशभरात डिजिटल पे करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यूपीआय असो किंवा यूपीआय लाइट असो या दोन्हींचा वापर वाढला आहे. यामुळे यूपीआय लाइटवरून पेमेंट करण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. यूपीआय लाइट वॉलेटची मर्यादा दोन हजार रुपयांवरून वाढून पाच हजार रुपये करण्यात आली आहे, तर यूपीआय 123 पे वरून ट्रान्झॅक्शन करण्याची मर्यादा पाच हजारांवरून दुप्पट म्हणजेच दहा हजार करण्यात आली आहे. त्यामुळे आता यूपीआय लाइट वॉलेटवरून पाच हजारांपर्यंत पेमेंट करता येणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आजच्या बैठकीत या बदलाची घोषणा केली आहे. आरबीआयने यूपीआयवरून टॅक्स भरण्याची मर्यादासुद्धा वाढवली आहे. यूपीआयवरून आता पाच लाख रुपयांपर्यंत टॅक्स भरता येऊ शकणार आहे. याआधी टॅक्स भरण्याची मर्यादा केवळ एक लाख रुपये होती.