Ind vs Nz Test Series 2024 – हिंदुस्थान दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा, केन विल्यमसन मालिकेला मुकणार?

बांगलादेशला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाचा संघ आता आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. मात्र हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाने आपल्या 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे केन विल्यमसन हिंदुस्थानात उशीराने दाखल होणार आहे.

न्यूझीलंड आगामी हिंदुस्थान दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या दौऱ्यासाठी न्युझीलंडच्या संघाचे सारथ्य टॉम लॅथन करणार आहे. मात्र दुसरिकडे न्युझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमुळे हिंदुस्थानात उशीरा दाखल होणार आहे. त्यामुळे न्युझीलंडच्या अडचणी काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. कारण हिंदुस्थानी खेळपट्ट्यांवर खेळण्याचा तगडा अनुभव केन विल्यमसनच्या पाठीशी आहे.

हिंदुस्थान दौऱ्यासाठी न्युझीलंडचा 17 सदस्यीय संघ

टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (पहिली कसोटी), केन विल्यमसन, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ रुर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टीम साऊदी, विल ओ रुर्क, ईश सोधी (दुसरी आणि तिसरी कसोटी), मिचेल सँटनर, विल यंग आणि बेन सियर्स