राज्यावर आठ लाख कोटींच कर्ज असताना महायुतीची उधळपट्टी, काँग्रेसची महायुती सरकारवर टीका

राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, तरी महायुती सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे असा आरोप काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. तसेच टेंडर काढा आणि कमिशन घ्या या धोरणानुसार बेफाम होऊन उधळपट्टी करत आहे असेही लोंढे म्हणाले.

 

एक्सवर केलेल्या पोस्मटध्ये अतुल लोंढे यांनी म्हणाले की, महाभ्रष्ट युती सरकारची महा उधळपट्टी चालली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने 90 कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. पाच दिवसांत हे 90 कोटी रूपये खर्च करायचे आहेत. म्हणजे दररोज 18 कोटी रुपये, प्रत्येक तासाला 75 लाख रुपये, प्रत्येक मिनिटाला जवळपास 1 लाख 25 हजार रुपये खर्च सरकार करत आहे. राज्यावर आठ लाख कोटींहून अधिकचे कर्ज आहे. सरकार मात्र टेंडर काढा आणि कमिशन घ्या या धोरणानुसार बेफाम होऊन उधळपट्टी करत असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.