इस्त्रायल आणि हमास यांच्यातील रक्तसंघर्ष चिघळत चाललेला असताना आता हिजबुल्लाहनेही आक्रमक धोरण अवलंबले आहे. तर प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडूनही दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. स्यामव मध्य पर्वत तणाव आणि वाढला आहे. समुद्रमागनिही हिजबुल्लाहला घेरण्याचीत रजनीता आखली आहे. सोमवारी इस्त्रायलने एका तासाच्या आत दक्षिण लेबॉननमध्ये हिजबुल्लाहच्या 120 हून अधिक तळांवर हल्ले केले. यात किमान 10 अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचा दावा लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
इस्रायलने लेबनीज लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असून मच्छीमारांना भूमध्य समुद्राला लागून असलेल्या ६० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवाई हल्ल्यांसोबतच इस्रायली सैन्य दक्षिण
लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवरही हल्ले करत असून लेबनॉनमधील जमिनी युद्धात आतापर्यंत ११ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमासचा हल्ला कधीही विसरू नये. जर मी इस्रायलचा अध्यक्ष असतो तर हमासने हल्ल्याची हिंमत केली नसती, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. फ्लोरिडामध्ये आयोजित रॅलीत ते बोलत होते.
900 अमेरिकन नागरिकांनी लेबनॉन सोडले
सप्टेंबरच्या अखेरीपासून सुमारे 900 अमेरिकन नागरिकांनी लेबनॉन सोडल्याचा दावा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने केला आहे. गेल्या महिन्यात इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने आतापर्यंत 8 उड्डाणे सुरू केली. दरम्यान, लेबनॉन सोडू इच्छिणारे सुमारे 8500 अमेरिकन नागरिक बैरुतमधील अमेरिकेच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत. त्यांच्यापैकी अनेकांकडे अमेरिका-लेबनॉनचे दुहेरी नागरिकत्व असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
हिजबुल्लाचा कमांडर ठार
इस्त्रायली सैन्याने सोमवारी बैरुत येथे केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला मुख्यालयाचा कमांडर सुहेल हुसैन हुसेनी मारला गेल्याचा दावा केला आहे. इराणमधून शस्त्रे आणण्याची आणि हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हुसैनीवर होती. हिजबुल्लाने मात्र याबाबत सांगितलेले नाही.
हिजबुल्लाहने डागली 190 रॉकेट
हिजबुल्लाहने सोमवारी 190 रॉकेट डागली. यात किमान 9 जण जखमी झाले. महामार्ग आणि अनेक घरांवर थेट हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्यानंतर इस्त्रायली लष्कराने सोमवारी रात्री गाझा येथील अल अक्सा रुग्णालयावर हल्ला केला. यात 21 जणांचा मृत्यू झाला. यात 5 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे. बुरेझ निर्वासिक कॅम्पवरही हल्ला करण्यात आला. यात किमान 12 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाल्याचे वृत्त अल जझिराने दिले आहे.