ऐकावे ते नवल! नोकरीच्या अर्जाला 48 वर्षांनंतर उत्तर

एका महिलेने नोकरीसाठी केलेल्या अर्जाला कंपनीकडून 1-2 नव्हे तर तब्बल 48 वर्षांनंतर उत्तर मिळाले. आज ही महिला 70 वर्षांची आहे. या अजब घटनेची चर्चा सध्या रंगलीय.

ब्रिटनमधील टिजी हडसन यांनी पाच दशकांपूर्वी बाईक स्टंट रायडर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. या नोकरीसाठी त्यांनी जानेवारी 1976 मध्ये अर्ज केला होता. त्या कंपनीच्या उत्तराची वाट पाहत होत्या. पण काहीच प्रतिसाद आला नाही. कंपनीने पत्राला प्रतिसाद का दिला नाही, याची त्यांना आयुष्यभर खंत वाटत होती. मात्र नुकतेच त्यांना हे पत्र मिळाले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर त्यांनी कंपनीला लिहिलेले पत्र कंपनीपर्यंत पोचलेच नव्हते. ते पोस्ट ऑफिसमधील एका ड्रॉव्हरमध्ये अडकले होते. स्टेन्स पोस्ट ऑफिसने माफी मागत त्यांना पत्र पाठवले.

हडसन यांना हे पत्र 48 वर्षांनंतर आणि 4-5 देश बदलल्यानंतर मिळाले. याबद्दल हडसन म्हणतात की हे पत्र कोणी परत केले किंवा त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले हे माहीत नाही. इतक्या दिवसांनी हे पत्र परत मिळणे अविश्वसनीय वाटते. त्यांनी मला कसे शोधले हे एक रहस्य आहे. यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.