स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) होत असलेल्या स्पेशलिस्ट कॅडरसाठी 1511 जागांच्या रिक्त पदांच्या भरतीला अखेर मुदतवाढ मिळाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली होती, पण आता मुदतवाढ देत ही तारीख आता 14 ऑक्टोबर करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसंबंधीची सविस्तर माहिती बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.