हरियाणा विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट हिने मैदान मारले असून जुलाना मतदारसंघातून ती 6 हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाली आहे. विनेशचा हा विजय यासाठी विशेष मानला जात आहे की काँग्रेसने 19 वर्षानंतर येथे मुसंडी मारली आहे. काँग्रेसचा उमेदवार शेवटचा 2005 ला येथून विजयी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे.
विधानसभा निवणुकीपूर्वी विनेश फोगाटने कुस्तीचे मैदान सोडून राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विनेशला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. आज झालेल्या मतमोजणीत विनेशने भाजप उमेदवार योगेश कुमार यांचा पराभव करत विजय मिळवला.
हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली. सुरुवातीचे कल काँग्रेसच्या बाजूने असल्याचे दिसले, तर भाजप पिछाडीवर होता. काँग्रेसने सुरुवातीच्या कलात बहुमताचा आकडा पार केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आनंदाने बेभान झाले. पंजाची पकड मजबूत होते असे वाटत असताना अचानक बाजी पलटली आई भाजपने मुसंडी मारली.