आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. त्यावर ‘आप’चे नेते मनीष सिसोदीया यांनी संताप व्यक्त करत मोदींनी त्यांच्या तोतो-मैना ईडीला पुन्हा मोकळे सोडले आहे असे म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संजीव अरोरा पंजाबचे आपचे खासदार आहेत.
मनीष सिसोदीया यांनी यावर आता त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे, त्यात त्यांनी लिहीले की, आज पुन्हा मोदींनी तोता-मैना ईडीला मोकळे सोडले आहे., आज सकाळपासून आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांच्या घरी छापेमारी केली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापेमारी केली, माझ्या घरी छापेमारी केली, संजय सिंह यांच्या घरी छापेमारी , सत्येंद्रजैन यांच्या घरी छापेमारी केली. पण कोणाचकडे काही मिळाले नाही. मात्र पूर्ण ताकदीने मोदींच्या तपास यंत्रणा एकापाठोपाठ एक खोट्या केस बनवण्यासाठी कामाला लागल्या आहेत. पुढे ते म्हणाले की, आम आदमी पक्षाला तोडण्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात. मात्र आम्हाला कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी आम आदमी पक्ष ना थांबणार, ना विकले जाणार आणि ना घाबरणार असा इशाराच ट्विटमधून दिला आहे.
आज फिर मोदीजी ने अपने तोता मैना को खुला छोड़ दिया है।
आज सुबह से आम आदमी पार्टी के राज्य सभा सांसद संजीव अरोड़ा जी के घर ED वाले रेड कर रहे है। पिछले दो सालों मैं इन्होंने अरविंद केजरीवाल के घर रेड कर लिया, मेरे घर रेड कर दिया, संजय सिंह के घर रेड दिया, सत्येंद्र जैन के घर रेड…— Manish Sisodia (@msisodia) October 7, 2024
आपचे खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी कायद्याचे पालन करणारा माणूस आहे. मला तपास यंत्रणेने का छापेमारी केली याबाबत निश्चित माहित नाही. तपास यंत्रणांसोबत पूर्ण सहकार्य करु आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन असे म्हंटले आहे.