चीनमध्ये धावणार ताशी 600 किमी वेगाने ट्रेन

हिंदुस्थानात धावणाऱ्या सर्वात वेगवान वंदे भारत ट्रेनची स्पीड 180 किमी प्रति तास आहे, परंतु या ट्रेनचा वेग कमी करून वंदे भारत रेल्वे 150 किमी प्रति तास चालवली जाते. परंतु, चीनमध्ये प्रति तास 600 किलोमीटर धावणाऱ्या मॅग्लेव ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या तुलनेत चीनमध्ये धावणारी ट्रेन तब्बल चार पट अधिक वेगाने धावताना दिसणार आहे. चीनमधील मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये प्रति तास 600 किलोमीटर धावणाऱ्या मॅग्लेव अल्ट्रा-हाय-स्पीड ट्रेनची चाचणी शांक्सी प्रांतात करण्यात आली.