‘व्हॉयजर 2’ हे नासाचे अंतराळ यान सर्वात जुने आहे. 1977 साली हे यान अंतराळात सोडण्यात आले होते. म्हणजे ‘व्हॉयजर 2’ यानाला 47 वर्षे झाली आहेत. अन्य ग्रहांचा शोध घेण्याची, डेटा गोळा करण्याची जबाबदारी या यानाची आहे. हे अंतराळ यान पुन्हा चर्चेत आलेय. नासाच्या मते, या यानाची ऊर्जा सतत कमी होतेय. त्यामुळे यानातील एक विद्युत उपकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या ‘व्हॉयजर 2’ यान पृथ्वीपासून 20.9 अब्ज किलोमीटर अंतरावर अंतराळात पुढे सरकत आहे. गेल्या काही वर्षांपासून यानाची काही उपकरणे बंद करावी लागली आहेत. 26 सप्टेंबर रोजी मिशन इंजिनीअर्सनी ‘व्हॉयजर 2’ चे प्लाझमा सायन्स उपकरण बंद करण्यासाठी सिग्नल पाठवले आहे.