हिंदुस्थानच्या भूमीतून कैलास पर्वताचे दर्शन

पवित्र कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी आता चीनव्याप्त तिबेटमध्ये जाण्याची गरज नसून आता थेट हिंदुस्थानच्या भूमीतून दर्शन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गुरुवारी पाच सदस्यीय पथकाने पिथौरागढमधील जुन्या लिपुलेख येथून कैलास पर्वताचे दर्शन घेतले. कुमाऊं मंडल विकास महामंडळाने यासाठी टूर पॅकेज जाहीर केले आहे. कैलास पर्वताला भेट देण्यासाठी पाच दिवसांचे टूर पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये आदि कैलास आणि ओम पर्वताच्या दर्शनाचाही समावेश आहे. प्रवाशांनी गुरुवारी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे पिथौरागढमधील गुंजी ठिकाणी नेण्यात आले होते.

चीनच्या सीमेवर जाण्याची गरज नाही

याआधी शिवभक्त लिपूपासून पायी प्रवास करत चीन सीमा ओलांडून कैलास मानसरोवरच्या दर्शनासाठी जात असत. परंतु कोरोनापासून हा प्रवास बंद आहे. हिंदुस्थान-चीन वादामुळे चीन सरकारने कैलास मानसरोवर यात्रेसाठी हिंदुस्थान सरकारला अद्याप संमती दिलेली नाही. त्यामुळे पिथौरागढच्या ग्रामस्थांनी 18 हजार फूट उंच लिपुलेख टेकडीवर एक ह्यू पॉइंट शोधला आहे, जिथून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. पेंद्र सरकारने 15 सप्टेंबरपासून जुने लिपुस भाविकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.