उत्तर प्रदेशच्या मिर्जापूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिर्झापूरच्या कछवा येथील कटका पडावजवळ ट्रक आणि टॅक्टरच्या धडकेत 10 मजूरांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर वाराणसी येथील आहेत. जखमींना उपचारासाठी ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
हे सर्व मजूर छताचे काम करायला जात होते आणि त्या दरम्यान ही घटना घडली. मिर्झापूरच्या अभिनंदन यांनी सांगितले की, ट्रकने ट्रॅक्टरला मागून धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. सर्व मृतदेहांना शवविच्छेदनासाठी शवगृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. तर ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. जखमींना वाराणसीचया ट्रामा सेंटर रेफर करण्यात आले आहे.