बदलापूरच्या नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेल्या कोतवाल आणि आपटेला पोलिसांनी बुधवारी रात्री कर्जतमधून अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केले. या वेळी एका गुह्यात त्यांना जामीन देण्यात आला, तर दुसऱया गुह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणातील एन्काऊंटर झालेला मुख्य आरोपी अक्षय शिंदेशी कोतवाल आणि आपटे यांचे काय कनेक्शन होते, याचा तपास आता पोलीस करणार आहेत.