हरयाणात माजी खासदार अशोक तंवर यांनी आधी भाजपसाठी प्रचार केला. त्यानंतर तासाभरातच म्हणजेच दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या मंचावर जात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हरयाणात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशाचे पह्टो शेअर करत अशोक तंवर यांनी ‘एक्स’वरूनही याबाबतची घोषणा केली. तंवर दुपारी 12 वाजता नलवा भागात भाजपसाठी प्रचार करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते कुलदीप बिष्णोई आणि राजेंद्र राठोडही उपस्थित होते. यावेळी भाजपला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर तासाभराने राहुल गांधी यांची प्रचार सभा होती. तंवर या प्रचार सभेला आले आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांनी त्यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतले.