गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी खराब आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या विधानाचे मला बिल्कूल आश्चर्य वाटले नाही असेही सुळे म्हणाल्या.
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादचा उल्लेख केला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी सर्वात खराब आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. भाजप ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतं. दुसरे पक्ष फोडून त्यांचे चिन्ह ओरबाडून घेतात. त्यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही त्यामुळे त्यांच्या विधानाचे मला बिल्कूल आश्चर्य वाटले नाही असेही सुळे म्हणाल्या.
VIDEO | Here’s what Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) MP Supriya Sule (@supriya_sule) said on Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis’ ‘vote jihad’ remark.
“Devendra Fadnavis as state Home Minister has given one of the worst track records in Maharashtra… pic.twitter.com/ZZ93eyIgi9
— Press Trust of India (@PTI_News) October 2, 2024