न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार टीम साऊदी हा कर्णधारपदावरून पायउतार झाला असून आता टॉम लॅथम न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. संघाचे हित लक्षात घेऊनचं हा निर्णय घेतला असल्याचे टीम साऊदीने म्हटले आहे.
टॉम साऊदीने 2008 मध्ये पदार्पण केल्यापासून 102 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये आत्तापर्यंत 382 विकेट्स घेतल्या. डिसेंबर 2022 कर्णाधारपदाचा कारभार स्वीकारल्यापासून त्याने 14 कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यापैकी 6 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. मात्र आता हिंदुस्थान दौऱ्याआधी त्याने राजीनामा दिला आहे.
कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देताना तो म्हणाला की, ‘न्यूझीलंडचे कर्णधारपद भूषवणं हा एक विशेषाधिकार आणि सन्मान आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत संघाला प्रथम स्थानावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की हा निर्णय संघासाठी सर्वोत्तम आहे. तसेच नवा कर्णधार टॉम लॅथम याला देखील त्याने शुभेच्छा देत मी कायम त्याच्या प्रवासात त्याला साथ देईन असे ही म्हटले.