पुण्यातील बाधवन परिसरामध्ये बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये दोन पायलटसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. (सर्व फोटो – दत्तात्रय रमेश आढाळगे)
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 3 मिनिटात हेलिकॉप्टर कोसळले.
डोंगराळ भागात असणाऱ्या धुक्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
हे हेलिकॉप्टर बाधवन येथून मुंबईतील जुहू येथे निघाले होते. याच हेलिकॉप्टरमधून पुढे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे प्रवास करणार होते, अशी माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे याच हेलिकॉप्टरने सुनील तटकरे हे मंगळवारी पुण्याहून परळीला गेले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्याला रवाना झाले.