राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लाडकी बहीण योजनेचा मोठा गवगवा करत आहे. त्याची जाहिरातबाजी करून कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. पण महाराष्ट्रात एका वर्षात 64 हजार मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत या बेपत्ता बहिणीचे काय झाले, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी, मोदी-शहांचा महाराष्ट्र दौरा अशा विविध विषयांवर भाष्य केले.