मुंबईतील गोरेगाव परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. एका शाळेतील विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. ती आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेत जात असताना डंपरने मागून धडक दिली. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात फिल्मसिटी रोडजवळ असलेल्या ओबेरॉय मॉलसमोर घडला. मंगळवारी सकाळच्या वेळेस एक मुलगी आपल्या वडिलांसोबत शाळेत जात होती. यावेळी अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक लोकांनी तातडीने घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली.
गोरेगावमध्ये भीषण अपघात; डंपरची दुचाकीला धडक, विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू#mumbaiaccident pic.twitter.com/vu5eKcybfv
— Saamana (@SaamanaOnline) October 1, 2024
पोलिसांनी सध्या डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याचा तपास सुरू केला. या घटनेमुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असताना प्रशासनाकडूनही पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जात नसल्याची टीका नागरीकांकडून होत आहे.