Photo – निऑन यलो गाऊनमध्ये मृणालचा ग्लॅमरस लूक, चाहते घायाळ

टिव्ही मालिकेपासून आपल्या अभिनयाला सुरुवात केलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती अबू धाबी येथे आयोजित केलेल्या ‘आयफा उत्सवम 2024’ दिसली. यावेळी तिने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता याने डिझाइन केलेला निऑन यलो गाउन घातला होता. त्यात तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता तिने तिच्या या गाउनमधील फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या गाऊनवर ती शॉर्ट हेअरमध्ये दिसत आहे. कानात डायमंड इअरिंग्स आणि हातात डायमंड रिंग घातली आहे. तर पायात सिल्व्हरचे हाय हिल सॅण्डल घातले आहेत. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिने छान वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोंचे भरभरुन कौतुक केले आहे.