गुलवीर सिंहची राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण धाव

हिंदुस्थानच्या गुलवीर सिंहने जपानमधील निगाटा येथे सुरू असलेल्या योगिबो अॅथलेटिक्स चॅलेंज कप स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. गतवर्षी हांगझोऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणार्या गुलवीरने या स्पर्धेतील पाच हजार मीटर शर्यतीत स्वतःचा विक्रम मोडताना 13 मिनिटे 11.82 सेपंद वेळेसह विजेतेपद पटकाविले.

26 वर्षीय गुलवीर सिंहने या वर्षाच्या सुरुवातीला पोर्टलॅण्ड ट्रक फेस्टिव्हल स्पर्धेत 13 मिनिटे 18.92 सेपंद वेळेसह राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. यावेळी जपानमध्ये त्याने आपल्या विक्रमात 10 सेपंदाने सुधारणा केली. गुलवीरच्या नावावर 10 हजार मीटर शर्यतीतही (27 मिनिटे 41.18 सेपंद) राष्ट्रीय विक्रम आहे. या शर्यतीतील विक्रमही त्याने या वर्षी मार्चमध्ये पॅलिपहर्नियात झालेल्या ‘टेन टॅक मीट’ शर्यतीत केला होता.