सोनं ‘लाख’ मोलाचं होणार, यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने नवा रेकॉर्ड केला. या वर्षी सोन्याच्या किमतीत 30 टक्के इतकी वाढ झाली. काही वर्षांत देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर एक लाखाच्या पार जाण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदर कपातीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे मानले जात आहे. आगामी काळात व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय इस्रायल आणि हिजबुल यांच्यातील तणावाचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.

जगभरातील केंद्रीय बँकांकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होतेय. या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ञांना वाटतेय.