Ind Vs Ban 2nd Test – पावसाने खेळ केला! एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसावर फेरलं पाणी

हिंदुस्थानविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसही पावसामुळे पाण्यात गेला आहे. कानपुरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू न होता संपूष्टात आला.

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपुरमध्ये शुक्रवार (27 सप्टेंबर 2024) पासून सुरू झाला आहे. मात्र पावसाचा व्यत्यय आणि अपुऱ्या प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांचा होऊ शकला. 35 षटकांमध्ये बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी आकाश दिपने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली. मोमिनुल हक 40 धावा आणि मुशफिकूर रहिम 06 धावाांवर नाबाद आहेत. त्यामुळे शनिवारी (28 सप्टेंबर 2024) बांगलादेशच्या धावसंख्येत भर घालण्यासाठी दोन्ही फलंदाज उत्सुक होते. मात्र त्यांच्या उत्सुकतेवर पावसाने पाणी फेरलं

शनिवारी कानपुरमध्ये पावसाने तुफान बॅटींग केली. त्यामुळे सामना सुरू करता आला नाही. आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ सुद्धा पावसाच्या बॅटींगमुळे रद्द करावा लागला. त्यामुळे आता दोन्ही संघांना उद्या (29 सप्टेंबर 2024)  संघांना तिसऱ्या दिवसाची प्रतिक्षा आहे.