भाजपचा नवा फंडा! काँग्रेसमधून आलेल्या भ्रष्ट नगरसेवकांचे गंगाजल आणि गोमूत्र पाजून शुद्धीकरण

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन शुद्धीकरण करण्याचा नवा फंडा भाजपने सुरु केला आहे. राजस्थानमध्ये हवामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालमुकुंदाचार्य यांनी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नगरसेवकांना गंगाजल आणि गोमूत्र पाजून त्यांचे शुद्धीकरण केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होते. दरम्यान, सर्वांचे शुद्धीकरण झाल्याने आता भ्रष्टाचार पळून जाईल, असे यावेळी महापौर पुसम यादव म्हणाल्या.

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपने जयपूरचे महापौर मुनेश गुर्जर यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागी कुसूम यादव यांची महापौरपदी निवड केली. यादव यांना काँग्रेसच्या सात आयाराम नगरसेवकांनी आणि एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिला आहे. या सर्वांचे पालिकेत शुद्धीकरण करण्यात आले.