कार्डवाल्यांचं ‘क्रेडिट’ घसरलं!, देशात डिफॉल्टरची संख्या वाढली

गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर बँकांनीही मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्ड देण्यात सुरुवात केलेय. याशिवाय क्रेडिट कार्डच्या शॉपिंगवर अनेक ऑफर्सही दिल्या जातात. त्यामुळे लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. मात्र, क्रेडिट कार्डधारकांची संख्या वाढली असली तरी लोकही त्याच वेगाने क्रेडिट कार्ड डिफॉल्टर बनत असल्याचे दिसून आलंय.

खरं तर क्रेडिट कार्डच्या थकबाकीचं लिमिट सातत्यानं वाढत आहे, ज्यामुळे क्रेडिट कार्डवरून कर्ज घेणाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्ड डिफॉल्ट मार्च 2023 मध्ये 1.6 टक्केच्या तुलनेत जून 2024 मध्ये 1.7 टक्क्यावरून 1.8 टक्केपर्यंत वाढले आहे.

जून 2024 पर्यंत 2.7 लाख कोटींची थकबाकी

आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून 2024 पर्यंत क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम सुमारे 2.7 लाख कोटी रुपये होती, तर मार्च 2024 मध्ये 2.6 लाख कोटी रुपये आणि मार्च 2023 मध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त होती.

काय नुकसान होईल…

क्रेडिट कार्डचं बिल अनेक महिने सलग न भरल्यास तुमचं खातं डिफॉल्ट होतं. खरं तर, जर आपण 30 दिवसांच्या आत रक्कम भरली नाही तर पहिलं क्रेडिट खातं ड्यू होईल, जर आपण सलग 6 महिने बिल भरलं नाही तर आपल्याला डिफॉल्ट कॅटेगरी म्हणून मार्क केलं जात.