जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) कडून जमीन वाटपाशी संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने शुक्रवारी कारवाई केली. विशेष न्यायालयाने सिद्धरामय्यांविरोधात लोकायुक्त पोलिसांना तपासाचे आदेश दिल्यानंतर दोन दिवसांनी हे प्रकरण समोर आले आहे.

सिद्धरामय्या यांच्या पत्नीला नियमांचे उल्लंघन करून MUDA द्वारे प्रीमियम मालमत्तांचे वाटप केल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये सिद्धरामय्या प्रथम आरोपी असून, त्यानंतर त्यांची पत्नी पार्वती, मेहुणा मल्लिकार्जुन स्वामी आणि कथित जमीन मालक देवराज यांचा समावेश आहे.